विश्वाच्या संघर्षात भारताला हिंदुस्थान म्हणून राहण्यासाठी अजिंक्य भूदल, अजिंक्य नौदल, अजिंक्य वायुदल यांच्या इतकीच, देशाधर्मासाठी जगावे आणि हसत हसत मरावे ही अक्षुण्ण निरंतर वर्धिष्णू प्रेरणा देणारे, हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन पुनर्संस्थापित करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. 

सुवर्ण सिंहासनाचे महत्व जाणून घेण्यासाठी ‘अधिक माहिती’ वर क्लिक करा.

  अधिक माहिती
 
 
 
 
 

हिंदुस्थानातील समस्त हिंदू समाजाचा अखंड प्रेरणास्त्रोत असणारे हे सिंहासन तुमच्या आमच्या सहकार्यानेच साकार होणार आहे. ते सहकार्य कसे व कोणत्या स्वरूपात आपण करू शकता आणि अश्या प्रकारच्या अधिक माहिती साठी वरील ‘आवाहन पत्रक’ वर क्लिक करा

आवाहन पत्रक
 
 
 
 

आदरणीय श्री.संभाजीराव भिडे गुरुजींची थोडक्यात ओळख…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून शिवपाईक घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळ कार्यरत. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तिमित करणारी बुध्दीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व !

आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी म्हणतात, “जसं मातीवाचून शेती नाही, फुला वाचून सुगंध नाही, प्राणा वाचून देह नाही, अगदी तसेच ‘शिवछत्रपती’ असल्याशिवाय हा देश टिकत नाही. शिवाजी – संभाजी हे मंत्रच देशाला वाचवू शकतात.  
 
 
 
 
 

ऐतिहासिक संदर्भ

“पुढे तक्तारूढ व्हावे म्हणून तक्त सुवर्णाचे बत्तीस मणाचे सिद्ध करविले. नवरत्ने अमौलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली”. (सभासद बखर)”पुढे तक्तारूढ व्हावे म्हणून तक्त सुवर्णाचे बत्तीस मणाचे सिद्ध करविले. नवरत्ने अमौलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली”. (सभासद बखर)