गुरुजींची ओळख

आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींची थोडक्यात ओळख

  • नाव: श्री. संभाजीराव भिडे गुरुजी
  • वय: ८५ वर्षांपेक्षा अधिक
  • शिक्षण: एम.एस्सी. भौतिक शास्त्र (Gold Medalist)
  • श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून श्री. शिवाजी महाराज व श्री. संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या हिंदवी स्वराजाच्या मार्गावर चालणारी आणि देव, देश, धर्म यांसाठी जगणारी शिवपाईकांची पिढी घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळ कार्यरत.
  • संपत्ती: एक धोतर-सदरा-टोपी अंगावर, एक दोरीवर, एक सतरंजी, १० x १० ची एक खोली, भेट मिळालेली पुस्तके आणि यांच्या एका हाकेवर हिंदवी स्वराज्यासाठी धाऊन येण्यास सिद्ध असलेले १० लाख सत्शील, सद्विचारी, सदाचरणी, सद्वर्तनी, निर्व्यसनी तरुण
  • दिनचर्या: आजही रोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार स्वत: घालतात, केवळ सायकल, लाल बस किंवा रेल्वेने आजही प्रवास करतात, एकवेळ जेवण…
  • संपर्क: कधीही, कुठेही, अगदी सहज कुणालाही भेटतात ,परवानगी किंवा वशिला लागत नाही. अंगात धग, रग, उर्मी शिल्लक असल्याने अंगरक्षक लागत नाहीत! शिवाजी-संभाजी रक्तगटाचे तरुण उभे करण्याचे व्रत घेऊन संपूर्ण भारतात अनवाणी फिरतात.

वय वर्ष ८५ असून देखील शिवरायांच्या रक्ताचा तरुण घडावा, यासाठी त्याने सह्याद्रीत शिवपाईक बनून जाणे आवश्यक आहे हे जाणून पुढच्या मोहिमेच्या आखणीसाठी स्वत: पायपीट करतात.

लाखोंच्या संख्येने मोहीमेत येणा-या तरुणांना अपाय न व्हावा यासाठी आधी स्वत: सर्व परिसर, मार्ग नजरेखालून, पावलाखालून घालतात…

पावलाखाली थेट तापलेला डांबरी रस्ता! डोक्यावर आग ओकणारा भास्कर! पण दोहोंना या शिवतपस्वींच्या तपाचे चटके बसत असणार खास! तपच असा! आगच अशी! धमकच अशी! की काळानेही यांचे चरणी लोटांगण घालावे!

अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तिमित करणारी बुध्दीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व !

आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी म्हणतात, “जसं मातीवाचून शेती नाही, फुला वाचून सुगंध नाही, प्राणा वाचून देह नाही, अगदी तसेच ‘शिवछत्रपती’ असल्याशिवाय हा देश टिकत नाही. शिवाजी – संभाजी हे मंत्रच देशाला वाचवू शकतात. जगावे कसे ते शिवरायांकडून शिकावं आणि मरावे कसे ते शंभूराजांकडून शिकावे. हिंदूंना राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, लोकशाही सकट टिकायचं असेल, स्वातंत्र्यासकट टिकायचे असेल, परंपरेसकट टिकायचे असेल आणि विश्वात मान सन्मानाचं मातृभूमीला स्थान द्यायचं असेल तर जशी अण्वस्त्र, अणुबॉम्ब, लोकसंख्या सर्व प्रकारची प्रगती आवश्यक आहे जसा देहातला प्राण तसा ‘श्री शिवाजी – श्री संभाजी’ मंत्र अत्यंत आवश्यक आहे !” म्हणूनच  हिंदुस्थानाचे भवितव्य उज्वल करणारी पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या रक्तगटाची उगवती तरुण पिढी घडविण्याचे कार्य गुरुजी अनेक वर्ष करत आहेत.

आज आदरणीय भिडे गुरुजींनी लाखोंच्या संख्येने धारकरी उभे केले आहेत. भिडे गुरुजींच्या प्रेरणेने १९९२ पासून रायगडावरील शिवछत्रपतींच्या मुर्तींची आणि समाधीची दररोज पुजा चालू केली. आजतागायत दररोज स्वखर्चाने शिवप्रतिष्ठानचे धारकरी रायगडावर शिवछ्त्रपतींची पूजा करत आहेत.

आदरणीय गुरुजींच्या मार्गदर्शनाने होणाऱ्या अनेक उपक्रमात आध्यात्मिक धर्मकार्य करणारे श्री.भैय्यूजी महाराज, श्री.नरेंद्र महाराज, श्री.अनिरुद्ध बापू, श्री.मारुतीबुवा रामदासी इत्यादींचा सहभाग लाभला आहे. तसेच हिंदुस्थानातील अनेक जागतिक कीर्तीचे इतिहास संशोधक-अभ्यासक सहभागी होतात. श्री.निनादराव बेडेकर, श्री.बाबासाहेब पुरंदरे, श्री.शेषराव मोरे, श्री.सु.ग. शेवडे, श्री.पांडुरंग बलकवडे, श्री.विश्वासराव पाटील, श्री.डॉ. अमर अडके, श्री.भाऊ तोरसेकर,श्री.अरविंद विठ्ठलराव कुलकर्णी, श्री.सच्चिदानंद शेवडे, श्री.सुनीलदादा चिंचोलकर, श्री.चारुदत्त आफळे, श्री.सुरेश चव्हाणके असे आजपर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. याला राजकीय सहभाग सुद्धा अपवाद नाही सर्वच राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते आपआपली राजकीय महत्वाकांक्षा आणि पक्षाचे राजकारण बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून सहभागी होतात.आतापर्यंत आदरणीय श्री.नरेंद्र मोदी, छत्रपती श्री उदयन महाराज, श्री.देवेंद्र फडणवीस, श्री.उद्धव ठाकरे, श्री.शरद पवार, श्री.आर. आर. पाटील, श्री.पतंगराव कदम, श्री.जयंत पाटील, श्री.प्रतिकदादा पाटील, श्री.विजयबापू शिवतरे, श्री.रणजित पाटील,श्री.राज ठाकरे, श्री.रमेश वांजळे, श्री.महादेव जानकर, श्री.रामदास आठवले, श्री.राजू शेट्टी आणि असे राजकीय पक्षातील अनेक आमदार-खासदार इत्यादी सहभागी झाले आहेत.

अशा शिवतपस्वी माननीय संभाजीराव भिडे गुरुजींना शतश: प्रणाम !