महत्व

सुवर्ण सिंहासनाचे महत्व

सलग आठशे वर्षाच्या जिहादी आक्रमणाने सबंध हिंदुस्थान जराजर्जर झाला होता. जागोजागी हिंदुस्थानच्या धर्म, संस्कृतीचे, माता भगिनींचे विटंबना सत्र अव्याहत सुरू होते. या जिहादी आक्रमणाचा अंदाज न आल्याने परमप्रतापी,अत्यंत शूर अशा राजेरजवाड्यानी या जिहादी आक्रमनापुढे नांगी टाकली. त्यानंतर प्रबळ असा कोणीही विरोधक या जिहादी परकीय आक्रमकांच्या समोर शिल्लक असा राहिला नव्हता. जे शिल्लक राहिले होते त्यांचा पूर्णतः निःपात करायला किंवा त्यांना या पातशाह्यांचे मांडलिक बनवण्यासाठी याच हिंदू राज्यांचा आसरा घेतला जात होता. सरदारकी, जहागिरी यासाठी हिंदूंच हिंदूंच्या राज्यांचे शत्रू बनले होते, आपल्या क्षुल्लक स्वार्थापोटी मंदिरांचे, स्तुपांचे, मूर्त्यांचे पतन उघड्या डोळ्याने पाहत होते. अर्थात सर्वच असे नव्हते, पण त्यांना आपण या पातशाह्यांचे पतन करून स्वधर्म, स्वराज्य यांचे रक्षण करू शकतो, याची खात्री वाटत नव्हती, हे होणे स्वप्नातही येणे अशक्य वाटावे अशी परिस्थिती पूर्ण हिंदुस्थान सहन करीत होता.
या दुःस्थितीला पालटण्यासाठी महाराष्ट्रातून एक वीर प्रयत्नरत होता, पण तुमच्या, आमच्या, सबंध हिंदुस्थानाच्या दुर्दैवाने त्यांना त्यात यश मिळू शकले नाही. त्या महान वीराचे नाव होते, छत्रपती श्री.शहाजीराजे भोसले. उत्तम पुत्र होणे, हे कोणासाठीही परमभाग्याचे लक्षण असते, उत्तम पुत्र म्हणजे कोण? जो आपल्या मातापित्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतो, आणि त्यात यशस्वी देखील होतो. त्या अर्थाने शहाजीराजे हे परम भाग्यशाली होते, जिजाऊ माता याही परम भाग्यशाली होत्या, म्हणूनच त्यांच्या पोटी, न केवळ भोसले कुळाचे, तर संपूर्ण हिंदुस्थानाचे भवितव्य पालटेल असे जीवितकार्य करून पुढील हजारो वर्षे ज्याना धर्म टिकावा, राष्ट्र टिकावे असे वाटते, त्याना निरंतर प्रेरणा देऊ शकणारा एक शिवसुर्य जन्माला आला. त्या शिवसुर्याचे नाव होते, छत्रपती श्री.शिवाजी महाराज भोसले. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत, ज्याकाळी स्वकीयच स्वराज्यावर चालून येत होते, सैन्य, खजिना सर्वच काही तुटपुंज असताना देखील आपल्या बुद्धीच्या, कल्पकतेच्या जोरावर श्रीशिवछत्रपतींनी कैक शतकांच्या कालावधीनंतर आपले स्वतंत्र आणि हिंदुस्थानाची मान गर्वाने उंचावेल असे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. श्रीशिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि ३२ मण सोन्याचे सिंहासन देखील निर्माण झाले.
इथे हे लक्षात घ्यायला हवे, हे सिंहासन केवळ सिंहासन नव्हते, पाची पातशाह्यांना मातीत घालून त्यावर महाराज स्थानापन्न झालेत, आणि समस्त प्रजा ही आश्वस्त झालीय, याचे हे चिन्ह होते. पुढे मात्र शिवरायांच्या, संभाजीराजांच्या जाण्यानंतर मात्र मराठयांना अखंड झुंज देण्याची प्रेरणा देणारे हे सुवर्ण सिंहासन झुल्फिकार खानाने फोडून, मराठ्यांच्या अस्मितेचा अपमान केला.ते सिंहासन तोडण्यामागे झुल्फिकारखान याचा नेमका काय हेतू असेल? तर शतकानुशतकं ज्या भारतमातेने जे आपलं वैभव जपलं आणि परकीय आक्रमकांनी लुटलं, तेच परमवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठीचे ते शक्ती स्थान, प्रेरणास्थान होते. अगदी संभाजीराजांना मोगलांनी ठार केल्यानंतर देखील मराठ्यांनी या दुःखातून जी उभारी घेतली, त्या उभारीमागे ते सिंहासन टिकवण्याची आणि तुटलेले सिंहासन पुन्हा पूर्ववत करण्याची जिद्द याच माध्यमातून आलेली.

अगदी थोडक्यात…

है याद हमें युग युग की, जलती अनेक घटनायें
जो माँ के सेवा पथ पर, आई बनकर विपदायें

हमने अभिषेक किया था, जननी का अरिशोणित से
हमने श्रृंगार किया था माता का अरिमुंडो से

हमने ही उसे दिया था, सांस्कृतिक उच्च सिंहासन
माँ जिस पर बैठी सुख से, करती थी जग का शासन

अब काल चक्र की गति से, वह टूट गया सिंहासन
अपना तन मन धन देकर हम करें पुनः संस्थापन

याच कारणासाठी श्रीशिवछत्रपतींनी आपला राज्याभिषेक करवून घेऊन ते सिंहासन उत्पन्न केलेले, ते राजा म्हणून मिरवून घेण्यासाठी नव्हे, तर भारतमातेचे गेलेले स्थान पुन्हा मिळवून देण्यासाठी. याच कारणासाठी झुल्फिकारखान याने ते सिंहासन तोडले, जेणेकरून मराठ्यांची लढण्याची प्रेरणा नष्ट व्हावी. पुढे मराठ्यांनी २७ वर्षे अखंड झुंज देऊन औरंग्याला याच मातीत गाडला, दिल्लीचे तख्त फोडले, पण पुढे इंग्रजी अंमल चालू झाला. तोही असंख्य हुतात्म्यांच्या रक्ताने जाऊन स्वातंत्र्य मिळाले, पण पाकिस्तान, बांगलादेश नामक भळभळती ,न भरणारी जखम घेऊन.
आज अशी स्थिती आहे की भारत स्वतंत्र आहे, काही बाबतीत स्वयंपूर्णही आहे, पण तरीही आपल्या जखमा पाकीस्तान, बांगलादेश नामक शत्रू नष्ट करून चिरस्थायी शांतता निर्माण करण्यास असक्षम आहे. याचे नेमकं कारण काय असावे? तर अहिंसेच्या अति डोसामुळे आपण इतिहासात या ही पेक्षा प्रबळ, खुनशी आणि कपटी शत्रूंना परास्त करून विजय मिळवला आहे, हेच आपण विसरून गेलो आहोत. परिणामी, दरवर्षी होणारे दहशतवादी हल्ले, सीमेवरील जवानांचे मृत्यू, काश्मिरी पंडितांचे पलायन याबाबत आपल्याला मौखिक निषेध व्यक्त करण्याचा पलीकडे काय करावे हेच सुचत नाही.

ही स्थिती पालटून भारतीय नागरिकांत स्वधर्म, स्वदेश याबाबत जागृत भावना निर्माण करणं जास्त गरजेचं आहे.  ही भावना रुजवण्यासाठी आपल्याकडे काही ना काही माध्यम हवे, जेणेकरून आपण सप्रमाण सांगू शकू, की आम्हाला हे अजिबात अशक्य नाही. शत्रूराष्ट्राच्या नरड्यावर पाय ठेऊन आम्ही अजिंक्य राहू शकतो, हा आत्मविश्वास आधी सर्वसामान्य नागरीकांच्या मनात ठसवायचा असेल, तर त्याला अनुसरून त्याच तोलामोलाचे उदाहरण आपल्याला जगासमोर उभे करायला हवे. ते माध्यम कोणते? ते उदाहरण कोणते? तर १००१% सुवर्णसिंहासन. त्याचसाठी सुवर्णसिंहासन पुनर्निर्माण करणे हे गरजेचेच आहे.

  • सुवर्णसिंहासनाचे संरक्षण ?
    शिवछत्रपतींची आणि संभाजी महाराजांची पुण्याई लक्षात घेता कष्ट करावे लागतील. महाराष्ट्रातील ३८ जिल्हे आणि ३९४ तालुके म्हणजे शिव छत्रपतींबद्दल विलक्षण आत्मीयता असलेला समाज आहे. एक दिवस एक तालुका या प्रमाणे मराठी वर्षातील ३६० दिवस ३६० तालुक्यातील तरणी-ताठ वाघाच्या काळजाची पोरं स्वखर्चाने जाऊन सुवर्ण सिंहासनाला २४ तास खडा पहारा देतील. ज्याप्रमाणे रायगडावरील महाराजांच्या समाधीची गेली २५ वर्षे दररोज पुजा फक्त एकट्या सांगली जिल्ह्यातुन होते.
    शिवपाईकांच्या सहभागातून निर्माण आणि शिवपाईकांच्या सहभागातून संरक्षण हीच कार्यामागची संकल्पना आहे. रयतेच्या राजासाठी त्यांच्या रयतेने हे शिवधनुष्य पेललच पाहिजे. सर्व जगाला या कार्याचा हेवा नक्कीच वाटेल. परंतु जर महाराज पाहत असतील तर महाराज ही अभिमानाने म्हणतील स्वराज्य स्थापनेसाठी पेटवलेला हिंदवी स्वराज्याचा धगधगता अग्निकुंड तो रणचंडी यज्ञ अजून इतक्या वर्षानंतर हि संपलेला नाही …..

सुवर्ण सिंहासन संकल्प पूर्णत्वास नेण्याचे नियोजन जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
सुवर्ण सिंहासन संकल्प नियोजन  कसे असेल ?……